Action for Agricultural Renewal in Maharashtra

50 Years of Advancement in Rural Development
News

सन २०२५-२६ चे सर्वोत्तम कामगिरीसाठीचे अफार्म सांघिक पुरस्कारांचे वितरण आणि कौतुक सोहळा !

अफार्म कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय वार्षिक संमेलन नुकतेच 'अफार्म संचलित डॉ. मुकुंद घारे प्रशिक्षण केंद्र', रांजे (ता. भोर, जि.पुणे) येथे २२-२३ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडले. यावेळी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गटांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम या स्वरूपात पुरस्कार देण्यात आले. कार्यकारी समिती सदस्यांनी यावेळी सर्वांचे मार्गदर्शन केले. अफार्मचे उपाध्यक्ष डॉ. मधुकर गुंबळे, कोषाध्यक्षा डॉ.सुधा कोठारी, समिती सदस्य डॉ.किशोर मोघे, श्री. आदिनाथ ओंबळे , श्री. शहाजी गडहीरे, डॉ. गिरीजा गोडबोले, श्रीमती रोहिणी करमुडी व श्री. सुभाष तांबोळी, कार्यकारी संचालक हे यावेळी उपस्थित होते. Integrated Rural Development Project, नंदुरबार या प्रकल्प गटाला यावर्षीचा सर्वोत्तम कामगिरी साठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. या गटात श्री.प्रदीप साळवे, श्री.मधुकर सरगाये, श्री.विजय सोनवणे, श्री.रोहित लोहार, श्री.सुरेंद्र कोवे, श्री. शिवाजी पावरा, श्री. किरण शिंदे यांचा समावेश होता. Holistic Rural Development Programme, Udgir, Latur या प्रकल्प गटाला यावर्षीचा सर्वोत्तम कामगिरी साठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला. या गटात श्री. राजेंद्र इंगळे, श्री. राजू राऊत, श्री. गणेश सुरूसे, श्री. दिपक सौलाखे, श्री विजय माने, श्री. मनोज जाधव यांचा यात समावेश होता. सर्वोत्तम कामगिरी साठीचा तृतीय पुरस्कार यावर्षी पुणे, अहिल्यानगर, नाशिक. ठाणे जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या Enhancing Livelihoods Security for Rural Women in Maharashtra - Phase II या प्रकल्पास मिळाला. या गटात, श्री.सावता दुधाळ, श्री हनुमंत दुधाळ, श्री. दत्तात्रय दहिभाते, श्री. ओंकार फरतरे, श्री. रुपेश ढगे, श्री. प्रदीप तांबे यांचा समावेश आहे. सर्वोत्तम कामगिरी साठीचा चतुर्थ पुरस्कार यावर्षी MRM Rural Livelihoods Development, Project दहिवडी (ता.माण, जि.सातारा) श्री.कांतीलाल देशमुख, श्री.प्रवीण भेंडे, श्री.दत्तात्रय दहिभाते, श्री.अभिजित खाडे यांचा यात समावेश होता. सर्व पुरस्कार्थी प्रकल्प गटातील कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि इतर सर्व गटांतील कार्यकर्त्यांचे सुद्धा त्यांच्या प्रयत्नांसाठी कौतुक !

Date: 2026-04-22
Location: Pune

News

AFARM enters into the MoU with Mahatma Phule Krishi Vidyapeeth

Partnership will focus on Sustainable Rural Livelihoods and Climate-Resilient Agricultural Technologies Action for Agricultural Renewal in Maharashtra (AFARM), Pune and Mahatma Phule Krishi Vidyapeeth (MPKV), Rahuri have formally entered into a Memorandum of Understanding (MoU) to strengthen collaboration on Sustainable Rural Livelihoods and Climate-Resilient Agricultural Technologies. This has major potential for revamping majority of existing practices in many rainfed agriculture dependent and draught prone districts of Maharashtra about adopting best practices with the scientific approach and the technical support through the expert orientation from Knowledge Resource and Extension Mechanism from MPKV & AFARM respectively. The MoU was signed on 23rd March 2026 in the presence of Dr. Vilas Kharche, Hon’ble Vice Chancellor, MPKV and Dr. Venkat Mayande, Chairperson, AFARM. This strategic partnership aims to integrate scientific research, field-level implementation, and knowledge dissemination to address emerging challenges in rural livelihoods under aberrant and changing climate conditions. Key Focus Areas of the Partnership- The collaboration between AFARM and MPKV will focus on: • Development and dissemination of climate-resilient and sustainable agricultural practices • Designing location-specific and crop-specific weather-based agro-advisories • Development of dynamic crop-weather calendars for improved decision-making • Joint action research and field validation of innovative livelihood models • Capacity building and training to enhance adaptive capacities of farmers and stakeholders • Strengthening linkages between scientific institutions and grassroots practitioners Talking about the roadmap ahead through this MoU, Dr. Venkat Mayande- Chairperson, AFARM said, “This MoU also envisages joint efforts in research, extension, training, and knowledge exchange, ensuring that scientific innovations effectively reach rural communities and provides a framework for long-term collaboration through Joint Pilot initiatives and Field Trials, Development of Scalable Models for Wider Dissemination, continued engagement through AFARM’s post-Summit action platforms”. Emphasising the importance of closer cooperation between academic institutions and field-based practitioner institution like AFARM, Shri. Subhash Tamboli, Executive Director said, “This partnership reflects AFARM’s continued commitment to building multi-stakeholder collaborations for strengthening rural livelihoods in Maharashtra. By combining academic excellence of MPKV with field-based experience of AFARM and its network, the initiative aims to create impactful, scalable, and climate-resilient livelihood solutions for rural communities. This will enable closer collaboration between research institutions and grassroots development practices.” This MoU builds on the collaboration initiated during the Maharashtra Rural Livelihoods Summit 2026, where MPKV partnered as a Knowledge Partner. The MoU is for upcoming period of three years. For more information, please contact: Shri. Subhash Tamboli, Executive Director, AFARM: 9822752054

Date: 2026-03-23
Location: Rahuri, Ahilyanagar

News

‘अफार्म’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यात ग्रामीण उपजीविका आणि कृषी तंत्रज्ञान प्रसार बद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षरी

महाराष्ट्रातील ग्रामीण विकास क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अध्यायाची सुरुवात ! अ‍ॅक्शन फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रिन्यूअल इन महाराष्ट्र (अफार्म), पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी शाश्वत ग्रामीण उपजीविका आणि हवामान-अनुकूल कृषी तंत्रज्ञानावरील सहकार्य अधिक दृढ व व्यापक करण्यासाठी औपचारिकपणे सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. २३ मार्च २०२६ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या धोरणात्मक भागीदारीचा व्यापक उद्देश हा सातत्याने बदलत्या हवामान परिस्थितीत ग्रामीण उपजीविकेतील उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, क्षेत्रीय अंमलबजावणी आणि ज्ञान-प्रसार यांचे एकत्रीकरण करणे हा आहे. या सामंजस्य करारामध्ये संशोधन, विस्तार, प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान या क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबद्दल विशेष आराखडा असेल. त्यामुळे वैज्ञानिक नवकल्पना ग्रामीण समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकतील. महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका शिखर परिषद २०२६ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अफार्म यांच्यात सुरू झालेल्या सहकार्यानंतर झालेला हा सामंजस्य करार या क्षेत्रात काम करण्यासाठी निश्चितच पथदर्शक असेल. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी असून या मार्फत संयुक्त पथदर्शी उपक्रम व क्षेत्रीय चाचण्या आणि व्यापक प्रसारासाठी मॉडेल्सचा विकास अपेक्षित आहे. या सामंजस्य कराराद्वारे आखल्या गेलेल्या आराखड्याबद्दल बोलताना, ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे म्हणाले, “या सामंजस्य करारामध्ये संशोधन, विस्तार, प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान या सर्व विषयांबद्दल केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तरतूद आहे. यामुळे वैज्ञानिक नवकल्पना ग्रामीण समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. तसेच संयुक्त पथदर्शी उपक्रम आणि क्षेत्रीय चाचण्या, व्यापक प्रसारासाठी मॉडेल्सचा विकास आणि AFARM च्या ग्रामीण उपजीविका शिखर परिषद २०२६ नंतरच्या कृती कार्यक्रमाद्वारे सर्वांचा निरंतर सहभाग वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहकार्यासाठी एक व्यवस्था विकसित होईल असा विश्वास वाटतो.” कृषी विद्यापीठासारखी शैक्षणिक संस्था आणि ‘अफार्म’ सारखी राज्यभर काम करणारी ‘अफार्म’ संस्था यांच्यातील घनिष्ठ सहकार्यावर कार्यकारी संचालक श्री. सुभाष तांबोळी म्हणाले, “ही भागीदारी महाराष्ट्रातील ग्रामीण उपजीविका बळकट करण्यासाठी विविध हितसंबंधी घटक-संस्था यांच्यात सहकार्याची भावना रुजवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल. कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि अफार्मच्या नेटवर्कच्या क्षेत्रीय अनुभवाशी सांगड घालून, ग्रामीण समुदायांसाठी प्रभावी, विस्तारक्षम आणि हवामान-अनुकूल उपजीविकेचे उपाय तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट ‘अफार्म’च्या ज्ञान-संशोधन विस्तार बद्दलच्या कामाला आदर्श जोड देणारे आहे. तसेच यातून संशोधन संस्था तळागाळातील विकास कार्य करण्यात अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करू शकतील असा विश्वास वाटतो.” अफार्म आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातील सहकार्यातून खालील मुद्द्यांवर संयुक्तपणे ज्ञानप्रसार तसेच मार्गदर्शनपर काम होईल: • हवामान-अनुकूल आणि शाश्वत कृषी पद्धतींचा विकास आणि प्रसार • विशिष्ट ठिकाण आणि पिकासाठी आवश्यक असणाऱ्या हवामानावर आधारित कृषी-सल्ला मार्गदर्शन सेवा • अचूक निर्णयासाठी परिस्थिती सदृश्य हवामान अनुकूल सुधारित पीक-आराखडा निर्मिती • नाविन्यपूर्ण उपजीविका मॉडेलचे संयुक्तपणे कृती-संशोधन आणि क्षेत्रीय पडताळणी • शेतकरी आणि हितधारकांची अनुकूलन क्षमता वाढवण्यासाठी क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण • कृषी-वैज्ञानिक संस्था आणि तळागाळातील तंत्रज्ञ व कृषी प्रसारक यांचा संबंध दृढ करणे. महाराष्ट्रातील ग्रामीण उपजीविका क्षेत्र सक्षम करण्यासाठी यातील विविध हितसंबंधी गटांमध्ये सहकार्य सदृढ करण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या ‘अफार्म’च्या वाटचालीतील हे महत्त्वाचे पाऊल आहे. कृषी विद्यापीठात असलेले अत्याधुनिक ज्ञान व शैक्षणिक जाण तसेच अफार्म च्या राज्यभर असलेल्या व्यापक संस्था-व्यक्ती यांच्या संपर्कक्षेत्रात असलेल्या अनुभवाशी सांगड घालून ग्रामीण समुदायांसाठी प्रभावी, विस्तारक्षम आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकणारे उपजीविका संबंधित उपाययोजना तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यातून संशोधन संस्था आणि तळागाळातील विकासकाम करणाऱ्या व्यक्ती-संस्था यांच्यात अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अफार्मची वाटचाल पुढे चालू राहणार आहे. सामंजस्य करार बद्दल जाणून घेण्यासाठी संपर्क: श्री. सुभाष तांबोळी, कार्यकारी संचालक, अफार्म (9822752054)

Date: 2026-03-23
Location: राहूरी, अहिल्यानगर

News

Maharashtra Rural Livelihoods Summit 2026 – Inaugural Ceremony

The Maharashtra Rural Livelihoods Summit 2026 was inaugurated by NABARD Online General Manager (Pune Regional Office), Mrs. Smruti Bhagat. The dignitaries present on the occasion included Former Vice Chancellor of Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Dr. Rajaram Deshmukh; CSR Head, Cummins India, Mr. Amit Lele; Managing Director, Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL), Mr. Sameer Pande; Former Agriculture Commissioner, Government of Maharashtra, Mr. Umakant Dangat; Mr. Alok Shukla from USHA; President of AFARM, Dr. Vyankat Mayande; and Executive Director of AFARM, Mr. Subhash Tamboli.

Date: 2026-01-28
Location: Yashada, Pune

News

Publication Ceremony!

During the inaugural ceremony of the “Maharashtra Rural Livelihoods Summit 2026” organised by AFARM, two significant publications were released by the distinguished dignitaries — the research report titled “Status of Livelihoods in Rural Maharashtra 2025” and a coffee table book titled “Livelihood Models of Rural Maharashtra,” which is based on success stories of several voluntary organisations across the state. On this occasion, Mr. Mohsin Khan, who played a key role in authoring the Rural Livelihood Status Report, was felicitated. The event also featured the screening of AFARM’s documentary film “Ubhari – A New Dawn for Rural Livelihoods,” based on the theme of rural livelihoods in Maharashtra.

Date: 2026-01-28
Location: Yashada, Pune